भिंगार दि ५ मार्च
नगर शहरात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला
असून, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, खून, अत्याचार, भुमाफिया, दरोडे या घटना घडत आहेत. या विरोधात शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे या निवेदनानंतर शहरातील परिस्थिती थोडीफार का होईना बदलेल अशी अपेक्षा असताना अवैद्य धंदे सर्रास उघडपणे सुरू असल्याचं समोर आले आहे.