Home शहर १० लाख दे नाही तर घरावर ताबा घेऊ सावेडी उपनगर मधील प्रकार...

१० लाख दे नाही तर घरावर ताबा घेऊ सावेडी उपनगर मधील प्रकार उघडकीस

अहमदनगर दि.१३ एप्रिल

ताबा हे सादर सुरू केल्या पासून मागील नऊ भागात शहरात ताबा मारणे कशा पद्धतीने मारले जातात याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले होते आणि ज्या नागरिकांवर अन्याय होत असेल त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन केले होते त्या नंतर बरचसे प्रकरणं समोर आले आहेत आणि आता नागरीक पोलिसांकडे धाव घेत आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्यात असाच एक गुन्हा दाखल झाला असून सावेडी उपनगरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सर्वसामान्यांची मालमत्ता बळकाविण्याचे प्रकार वाढले आहेत त्यातील असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे.

अभिजीत भिमराव शिंदे (वय 33 रा. मनिषा रो. हाऊसिंग सोसायटी, समर्थनगर, पाईपलाइनरोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 15 ते 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर बळकावून घेवु व तुम्हाला कोणाला जिवंत ठेवणार नाही, असे जर होवु द्यायचे नसेल तर तुम्ही आम्हाला 10 लाख रूपये द्या, असे म्हणत एका कुटूंबाला धमकी देण्यात आली आहे.

उमाकांत किसन थोरवे, संगिता किसन थोरवे, लता बडे (पूर्ण नाव माहिती नाही), तुषार उमाकांत थोरवे व 10 ते 12 अनोळखी इसम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी उमाकांत थोरवे याला अटक केली आहे.

फिर्यादी अभिजीत भिमराव शिंदे यांचे पाईपलाइन रोडवरील समर्थनगरमधील मनिषा रो हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे. ते घर त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे.त्या घरामध्ये उमाकांत थोरवे घुसून राहत असल्याबाबत ऑगस्ट 2021 मध्ये फिर्यादी यांच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर थोरवे हे घर सोडून कुटूंबासह निघुन गेले होते.

यानंतर अभिजीत भिमराव शिंदे आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य त्या घरामध्ये राहण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी शिंदे त्यांच्या कुटूंबासह घरामध्ये असताना आरोपी तेथे आले. ते फिर्यादीला म्हणाले,‘आम्ही तुमचे घर खाली केले आहे.त्याचे आम्हाला 10 लाख रूपये द्या, नाहीतर आम्ही पुन्हा तुमच्या घरावर ताबा घेऊ, तुम्हाला घराबाहेर काढू, जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला कोणालाही जिवंत सोडणार नाही व तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली असल्याचे अभिजीत भिमराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version