अहमदनगर दि १६ फेब्रुवारी
पंधरा वर्षापूर्वी भिमा लक्ष्मण म्हस्के याला शेवगाव पोलिसांनी पकडले होते भिमा लक्ष्मण म्हस्के हा रात्रीच्या वेळी स्कॉपिओ जीप मध्ये लोखंडी कटावणी, गुप्ती, पक्कड, काठ्या व मिरचीपुड घेऊन आपल्या साथीदारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत निघाले होते मात्र याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी भीमा लक्ष्मण म्हस्के याला पकडले होते मात्र यावेळी त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते भीमा मस्के याच्यासह त्याच्या साथीदारांवर 27 ऑगस्ट 2007 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याचा साथीदार संजय नारायण फुगारे फरार होता.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील
सपोनि/गणेश इंगळे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने,पोना/भिमराज खसे, देवेंद्र शेलार, दिपक शिंदे यांनी संजय फुगारे याच्याबद्दल माहिती घेतली संजय नारायण फुगारे हा नगर शहरातील नागापूर बोल्हेगाव याठिकाणी येणार असल्याची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटीलअपर पोलीस अधीक्षक सौरभ कूमार आगरवाल शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारु सुदर्शन मुंढे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि/गणेश इंगळे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने,पोना/भिमराज खसे, देवेंद्र शेलार, दिपक शिंदे यांनी केली आहे.
भिमा लक्ष्मण म्हस्के आणि संजय फुगारे गॅंग ब्लॅक डायमंड गॅंग म्हणून ओळखली जायची अहमदनगर पुणे ,बीड, औरंगाबाद या ठिकाणी दरोडे टाकून फरार झालेली होती विशेष म्हणजे काळी गाडी काळा गॉगल आणि काळे कपडे घालूनच हे सराईत गुन्हेगार गुन्ह करायचे