Homeक्राईम११ वर्षापुर्वी खून करून पुरावा जळणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या...

११ वर्षापुर्वी खून करून पुरावा जळणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या ओळख बदलून लपला होता आरोपी

advertisement

अहमदनगर दि.११ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात २०११ साली भरत मारुती सानप याच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये घातपात, अपहरण व जबरी चोरी आशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते.

या प्रकरणातील अपहरन झालेल्या व्यक्तीचा तपास लागलेला नव्हता या बाबत २३ मार्च २०११ रोजी  नितीन सखाराम सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली होती फिर्यादीचा भाऊ अनिल सखाराम सोनवणे आणि त्याचा ड्रायव्हर भरत मारुती सानप हे दोघे रायपुर येथे बायडींग वायर भरण्यायाठी गेले होते. मात्र काही दिवसांनी सदरची माल ट्रक बेवारस अवस्थेमध्ये भगवानगड, ता. पाथर्डी येथे मिळुन आली होती. सदर ट्रक मधील बायडींग वायर नव्हती तसेच ट्रकचे कॅबीनमध्ये रक्ताचे डाग दिसले होते. तसेच भाऊ अनिल सोनवणे याचे सोबतचा ड्रायव्हर नामे भरत सानप याचा फोन बंद होता. यावरुन भरत सानप याने फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करुन ट्रक मधील ५,४८,९४०/- रु.कि.ची. बायडींग वायर बळजबरीने चोरुननेली आहे. या बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र तेव्हा पासून या प्रकरणातील आरोपी हा फरार होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्या नुसार या प्रकरणातील आरोपी भरत मारुती सानप रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड हा सध्या कन्हेरवाडी, ता. परळी, जिल्हा बीड येथे स्वतःचे नावात बदल करुन व ओळख लपवुन राहत आहे. अशी माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता तो स्वतःला भरत नाव नसून अभिमान नाव असल्याचे सांगत होता त्या नावाचे आधारकार्ड त्या आरोपीकडे असल्याने पोलीस पथकही काही काळ चक्रावून गेले होते मात्र पोलिसांनी त्याचा सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्याच्या कडे सन २००६ मधील मतदान ओळखपत्र सापडले त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आणि मग त्याने पोपटा सारखे तोंड उघडले खुनाची खरी हकीकत सांगितली.

मयत अनिल सोनवणे हा नेहमी मला माझ्या पत्नी विषयी वाईट बोलायचा त्याचा मला राग होता म्हणुन  गोंदिया येथे ट्रकचे टायर मधील हवा चेक करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यावेळी आमचेमध्ये वाद झाले मला त्याचा राग आल्याने मी त्याचे डोक्यात व्हील पान्हा डोक्यात मारला होता त्यावेळी तो जागेवर बेशुध्द झाल्याने मी त्यास तसाच उचलुन गाडीचे केबिनमध्ये टाकला होता. मी ट्रक चालवित सिंधखेडराजा येथे आल्यावर अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाला आहे असे समजुन मी त्यास सिंधखेडराजा ते जालना जाणारे रोडवरील खदान जवळ नाल्यावरील पुला जवळ ट्रक थांबवुन ट्रक मधील अंथरुन व पांघरुन घेण्याचे कपडे व नाल्या जवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकुन त्यास पेटवुन देवुन तेथुन निघुन आलो अशी माहिती दिली.

या बाबत स्थानिक गुन्हे तपास पथकाने सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन खात्री केली असतंट्या ठिकाणी अज्ञात आरोपी विरुद्ध खून करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे समोर आले १९ वर्षा पासून खून करून फरार असलेल्या आरोपीचा अखेर ठावठिकाणा सवडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीला पुढील तपास पाथर्डी पोलिसांच्या हवाली केले आहे.

११ वर्षापुर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेल्या खुनाचा
गुन्हा उघडकिस आणुन आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक तपास उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार आगरवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन मुंढे साहेब,यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटक, स्थानिक गुन्हे शाखेतील
सपोनि/गणेश इंगळे, सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने, पोना/भिमराज खसे, सुरेश
माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व चापोहेकॉ/बबन बेरड यांच्या स्वंतत्र पथकाने केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular