Homeजिल्हा३१ डिसेंबरला पुण्याला प्रवासाला जाणार अस्तातल तर हे नक्की वाचा अहमदनगर-पुणे महामार्गावरील...

३१ डिसेंबरला पुण्याला प्रवासाला जाणार अस्तातल तर हे नक्की वाचा अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल!

advertisement

पुणे – दि.२८
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाजवळील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला मोठी गर्दी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. पुणे आणि मुंबईहून अहमदनगरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीत २९ तासांसाठी बदल करण्यात आलेले आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोस्तही तैनात करण्यात आला आहे.

अशी असेल वाहतूक
👉पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- केडगाव – चौफुली – न्हावरा – शिरूरमार्गे अहमदनगरकडे येईल. अहमदनगरकडून पुण्याकडे जाताना याचमार्गे वाहने जातील.

👉मुंबईहून अहमदनगरकडे येणारी जड वाहतूक वडगाव मावळ- चाकण- खेड- मंचर– नारायणगाव- आळेफाटा– अहमदनगर अशी येतील. अहमदनगरहून मुंबईकडे जाणाऱ्यांनाही याच रस्त्याने जावे लागेल.

👉मुंबईहून अहमदनगरकडे जाणारी इतर वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूरमार्गे अहमदनगरकडे येतील.

👉सोलापूरहून चाकणकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- विश्रांतवाडी – आळंदीमार्गे चाकण अशी जातील.

त्यामुळे 31 डिसेंबरला पुण्याला प्रवासाला जाताना वरील सूचनांचे पालन करूनच प्रवाशांनी प्रवास करावा.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular