अहमदनगर दि १६ मार्च
जागतिक महिला दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमतमहोत्सव यांचे औचित्य साधून विजया लक्ष्मण काळे फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा २० मार्च रोजी अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे अशी माहिती शिवमती अनिताताई काळे यांनी दिलीय.
या सन्मान सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील संगमनेर च्या माजी नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे विद्याताई गडाख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यासह बचत गटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत तसेच खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमातून बक्षिस मिळवण्याची संधी महिलांसाठी असून पैठणी साडी,सोन्याची नथ,चांदीचे जोडवे आशा सौभाग्य अलंकारासह अनेक बक्षिसे कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंकण्याची संधी सहभागी झालेल्या महिलांना मिळणार आहे.
ज्या बचत गटांना या कार्यक्रमा दरम्यान खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्याची ईच्छा असेल तर त्या महिलांनी .मिनाक्षी जाधव-9423755132 आणि माया हराळ 7972821165 या मोबाईल नंबर संपर्क साधावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजीका शिवमती अनिताताई काळे यांनी केले आहे .
माऊली सभागृहात २० मार्च रोजी सायंकाळी चार वाजता अत्यंत भव्यदिव्य असा संस्मरणीय कार्यक्रम होणार असून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ,खाद्य पदार्थांची रेलचेल आणि खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून बक्षिसांची लायलूट करण्याची संधी आशा कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींना उस्थितीती लावावी असे आवाहन कार्यक्रमाच्या अयोजका शिवमती अनिताताई काळे यांनी केले आहे.