Homeक्राईममर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दहा कोटी २५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरण पुढील तपास...

मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दहा कोटी २५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरण पुढील तपास तातडीने करा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील

advertisement

अहमदनगर, दि.२६सप्टेंबर

नगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Merchants Cooperative Bank ) दहा कोटी २५ लाख रुपयांच्या (10 Crores 25 Lakhs) फसवणूक प्रकरणात (fraud case ) दोन वर्षांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात उद्योजक साळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात मनपा कचरा संकलन घोटाळा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात मर्चंट बँकेशी संबंधित फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात कारवाई होत नसल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे तक्रार केली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास संथगतीने सुरू असून, तपासासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

शेवटी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना या प्रकरणाचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. एमआयडीसी पोलिसांनी (midc police) मागील महिन्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी यांच्यासह दोनजणांची चौकशी करून त्यांचे जबाब घेतलेले होते. तसेच, बँकेसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र देऊन या संदर्भातील माहिती आणि ऑडिट रिपोर्टसुद्धा पोलिसांनी मागितले होते. मात्र, ही कागदपत्रे पोलिसांना अद्यापि मिळालेली नाहीत. त्यामुळे तपास थंडावला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेच या प्रकरणाचा अहवाल पाठवला आहे.

दरम्यान, तपास कशा पद्धतीने करण्यात आला, जबाब घेतलेल्यांनी काय माहिती दिली तसेच त्यांनी दिलेल्या जबाबाची खात्री पोलिसांनी केली आहे का, असे प्रश्न या अहवालाबाबत उपस्थित होत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular