Homeराजकारणएकाच महिन्यात शिवसेनेकडून दोन न्याय दोन नेत्यांवर आरोप झाले एक नेता तात्काळ...

एकाच महिन्यात शिवसेनेकडून दोन न्याय दोन नेत्यांवर आरोप झाले एक नेता तात्काळ पदावरून हटवला तर दुसऱ्या नेत्याला उमेदवारीची बक्षिसी

advertisement

अहमदनगर – दि.१२ डिसेंबर
दोन महिन्यांपूर्वी नगर शहराजवळ असलेल्या केडगाव बायपास येथे एका हॉटेलवर पुरवठा विभागाने छापा टाकून बायोडिझेल विक्री करत असल्याचा आरोप खाली काही हॉटेल चालकांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर नगर सोलापूर रोड वरील वाटेफळ या ठिकाणीही अशीच कारवाई करून गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस स्टेशन आणि तोफखाना पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला होता. कोतवाली पोलिस स्टेशनच्या गुन्ह्या मध्ये तपासाअंती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे नाव आले त्यांचे नाव आल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेत या प्रकरणी अटक पूर्व जामीन ही घेतलेला आहे. मात्र शिवसेनेने तातडीने दिलीप सातपुते यांना पदावरून काढून टाकत त्या ठिकाणी दुसऱ्या शहर प्रमुखाची नियुक्ती केली आहे. मात्र शिवसेनेने ही घाई तर केली नाही ना असा प्रश्न आता शिवसेनेतील काही नगरसेवकांनी आणि सातपुते समर्थकांनी बोलून दाखवली आहे.

इकडे खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला असताना त्याबाबत थेट राष्ट्रवादाची सर्वासर्वे खासदार शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती तर गांजा प्रकरणात नवाब मलिक यांनीसुद्धा आपल्या निकटवर्तीयांचे बाजू घेतली होती. एवढे मोठे आरोप होऊन सुद्धा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी होत नाही असं दोन्ही नेत्यांनी ठणकावून सांगितलं होतं. तर नुकताच नगर तालुक्यातील एक शिवसेनेच्या नेत्यावर अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला मात्र याला  विरोधकांचा डाव म्हणून त्या नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली   मात्र नगर शहरातील बायोडिझेल प्रकरणी दिलीप सातपुते यांचे नाव येताच त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं होत. त्यानंतर शहरातील एकही शिवसेनेचा पदाधिकारी याबद्दल बोललं नाही हे विशेष आणि महत्वाचे म्हणजे प्रयोगशाळेतून पुरवठा विभागाला आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की पुरवठा विभागाने कारवाईत पकडलेले बायोडीजल नसून ऑइल आहे. मात्र त्या नंतरही दिलीप सातपुते यांच्या बाजूने कोणता पदाधिकारी का उभा राहिला नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दिलीप सातपुते हे स्वर्गीय अनिल राठोड यांचे निकटवर्ती होते तसेच अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेमध्ये मध्यंतरी दोन गट पडले होते. आता हे दोन्ही गट एकत्र आल्याचे आल्याचे दिसत असले तरी दिलीप सातपुते यांच्या वर झालेल्या आरोपावरून आणि त्यांच्या झालेल्या हाकलपट्टी वरून शिवसेनेच्या नेत्यांनी एकही शब्द काढला नाही.

त्यामुळे काही नगरसेवक नाराज आहेत दिलीप सातपुते यांनी शहरातील विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला याबद्दल नेहमीच विरोधाची भूमिका घेतली म्हणून काही नगरसेवक नाराज असल्याचे समजते दिलीप सातपुते यांना बायोडिझेल प्रकरणे राजकीय हेतूने अडकवले जात असल्याचा आरोप दिलीप सातपुते समर्थकांनी केला होता सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या आणि दिलीप सातपुते यांच्यावर बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या बाबत काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन दिलीप सातपुते यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी भूमिका मांडण्याचे ठरवले असताना ही भूमिका कुणी मांडून दिली नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहते त्यामुळे दिलीप सातपुते यांच्या बद्दल शिवसेनेने घेतलेली भूमिका त्यांच्या समर्थकांना खटकली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular