HomeUncategorizedनिशांत दिवाळी अंकांची 22 वी आवृत्ती प्रसिद्ध राज्यस्तरीय मान्यवरांच्या परिसंवादसह स्थानिक लेखकांचे...

निशांत दिवाळी अंकांची 22 वी आवृत्ती प्रसिद्ध राज्यस्तरीय मान्यवरांच्या परिसंवादसह स्थानिक लेखकांचे विचार

advertisement

अहमदनगर दि.२० ऑक्टोबर –
निशांत दिवाळी अंकाचा 22 वा विशेषांक प्रसिद्ध झाला असून या वर्षीच्या अंकामध्ये नाविन्यपूर्ण व वैचारीक लेखांसह कविता, विनोदी कथा आदिंचा समावेश असल्याची माहिती संपादक निशांत दातीर यांनी दिली.
अवलोकानाचं वर्ष या परिसंवादात ज्येष्ठ अभ्यासक डॉ.निलेश शिरोडकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, निवृत्त लेफ्ट.जन. दत्तात्रय शेकटकर, डॉ.अशोक ढगे, राजीव पंडित, कैलास ठोके या मान्यवरांचे विविध विषयांवर मत प्रदर्शित करण्यात आले आहे.

भारतीय राजकारण नव्या वळणावर या परिसंवादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे, अनिकेत जोशी, दिलीप चावरे, माजी आ.उल्हास पवार, प्रा.भानुदास बेरड या राजकीय विश्लेषकांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ‘कुटूंब आजचं समस्या उद्याच्या’ या कौटूंबिक परिसंवादत भारतीय कुटूंब व्यवस्थेचे अभ्यासक संजय कुलकर्णी, शिक्षण क्षेत्रातील जाणकार रेणु गावस्कर, महिला अभ्यासक विद्युत भागवत, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे, भास्कर खंडागळे, हेमंत हरहरे आदिंचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. तो होता गोल्डन एरा या सांस्कृतिक परिसंवादत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ संयोजक विरेंद्र चित्राव, निसर्ग अभ्यासक प्र.के.घाणेकर, सतीश पाकणीकर, मारुती चित्तमपल्ली आदिंचे अनुभवचित्रण केले आहे. मैत्री प्रेम कि आकर्षण यात चित्रपटसृष्टीशी संबंधित परिसंवादत ज्येष्ठ हास्य कलाकार श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी, तेजश्री प्रधान, अनिता दाते या महिला कलाकारांचे विचार प्रदर्शित करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त ज्येष्ठ ज्योतिष भास्कर नारायण कारंजकर यांचे वार्षिक भविष्य, साहित्यातील आई व पैंज हे दत्तात्रय म्हेतर, दुर्गा – अंजली श्रीवास्तव, तुका झालासे कळस- वसंत दातीर, माणुसकिच्या नात्यांनी आणि शद्बांनी जगण्याला आधार दिला – आशिष निनगुणकर, नागेश शेवाळकर यांचे एक दिन औषधाविन आदिंसह सत्यपाल श्रीवास्तव, शरद अत्रे, महादेव साने, आनंद देशमुख, अजित कटारिया आदिंच्या कविता समाविष्ठ करण्यात आल्या आहेत.

एकूण 128 कृष्णधवल पानांसह 16 रंगीत पानांच्या भरगच्च अंकाचे आकर्षक मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधत आहे. मुखपृष्ठ ज्ञानेश शिंदे, अक्षर जुळणी बापू बराटे, अंक सजावट पुणे येथील अद्वैत फिचर्स, छपाई सिद्धीगणेश ऑफसेट यांनी केले आहे.
या अंकासाठी दत्तात्रय झगडे, अमोल देवकर, उमेश अनभुले, रामेश्वर तांबे, स्वानंद पिंपुटकर, संदिप दिवटे आदिंनी परिश्रम घेतले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

21:22