Homeविशेषसंत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषण, श्री संत...

संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषण, श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

advertisement

अहमदनगर–

पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, संत निळोबाराय सेवा संस्थांनचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत,अध्यक्ष ज्ञानदेव पठारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत परंपरेत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. संत साहित्य आपला अध्यात्मिक ठेवा आहे. संतांनी मानवकल्याणाची शिकवण दिली असून या विचारांवर महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे. ही परंपरा सर्वांनी पुढे चालू ठेवली पाहिजे असे सांगत अशोक सावंत यांच्या माध्यमातून श्री संत निळोबाराय मंदिर परिसराचा चांगला विकास होत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी आवर्जून केला


श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले .
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत परंपरेत श्री निळोबारायांच्या स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे आणि सर्वजण समान असून आपापसात कोणताही भेदभाव नाही ही शिकवण संत निळोबारायांनी दिल्याचे सांगितले.

आ. निलेश लंके यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र पिंपळनेर येथील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले.

श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला संत निळोबाराय सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आर बी रासकर, सचिव चांगदेव शिर्के, निळोबाराय संस्थानचे सचिव लक्ष्मण खामकर, या सोहळ्याचे प्रमुख आणि संत निळोबाराय यांचे वंशज व विश्वस्त गोपाळ काका मकाशीर ,सुभाष जेक्ते,रामदास वाघुले ,सरपंच सुभाषराव गाजरे उपसरपंच ,अमोल पोटे ग्रामसेवक शशिकांत नरवडे सर्व ग्रामपंचायत सदस्य
ग्रामस्थ, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular