अहमदनगर दि.७ जुलै
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मधील गाळ्या बाबत न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले आहेत त्या गाळया बाबत आता चांगलेच राजकारण तापले असून काल व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये आंदोलन करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा निषेध केला होता.

आज नगर शहरात शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिलीप सातपुते,नगरसेवक योगीराज गाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषद घेऊन या गाळया बाबत भूमिका विषद केली.
ज्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहे ते गाळे शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठीची जागा होती.ज्या जागेवर बांधकाम करण्याचा परवाना मिळणार नाही त्याचा जागेवर बांधकाम करण्यात आले आहेत.
या वेळी बोलताना दिलीप सातपुते म्हणाले की ज्या गाळे धारकांनी काल आंदोलन केले त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आंदोलन न करता ज्या लोकांनी त्यांना फसवले त्यांच्या कार्यालय समोर जाऊन आंदोलन केले असते तर आम्ही त्यांच्या सोबत उभा राहिलो असतो.आणि यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना राजेंद्र चोपडा यांनी न्यायालयाचा आदेशाचा अवमान केला असून आमच्यावर जे आरोप केले आहे त्या बाबत गुन्हा दाखल करणार आहोत तसेच न्यायालयात या बाबत आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
संदेश कार्ले म्हणाले की या गाळया बाबत व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली असून आम्ही जेव्हा या गाळे बांधण्यात बाबत तत्कालीन पदाधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांना काहीच उत्तर देता आले नाही.कृषी उत्त्पन बाजार समिती मध्ये शेतकऱ्या बाबत दूजाभाव करण्यात येतो.ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत नाही तर इतर दुकाने सुरू आहेत मात्र व्यापाऱ्यांनी सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा व्यापारी अजून फासले जाण्याची श्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं.
योगीराज गाडे म्हणले की आम्ही कोर्टात गेलो नाही तर प्रशासकीय पातळी वर ही कारवाई झाली आहे मात्र आता ज्या लोकांना हे माहीत झाले आहे की व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असून हे खापर मार्केट कमितीचे तत्कालीन संचालक होते त्यांनी आमच्यावर आरोप करून व्यापाऱ्यांना आमच्या विरोधात उभे केले आहे.या संचलंकाच्या मागे सोयरे धायरे आपले खिसा गरम करत आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या विरोधात आता रस्त्यावर उतरले पाहिजे या ठिकाणी एक टोळी असून ही टोळी व्यापाऱ्यांना फसवत असल्याचे गाडे यांनी सांगितलय.
बाळासाहेब हराळ म्हणाले की न्यायालयाने दिलेला आदेश असा आहे की अनधिकृत गाळे पडावे असे असताना व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत मात्र हे अनधिकृत असल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो मात्र काही तत्कालीन संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला फसवले आहे.हे गाळे अनधिकृत असल्याचे माहीत असताना गाळे घेतले गेले त्यात आम्ही फसवणूक कुठे केली हे आम्हाला दाखवून द्यावे मात्र आम्ही कोणत्याही व्याप्र्याच्या विरोधात नाही शेतकऱ्यांची बाजार समिती वाचवत आहोत.ज्या लोकांनी फसवणूक केली त्यांच्या विरोधात व्यापारी उतरणार असतील तर आम्ही तुमच्या सोबत राहू असेही बाळासाहेब हराळ यांनी सांगितलय.





