अहमदनगर शहरा मध्ये रात्रीतून काय घडते हे सांगू शकत नाही या आधी शहरामध्ये रात्रीस खेळ चाले या प्रकारांमधून अनेक प्रकार घडले आहेत.असा प्रकार नगर शहरातील झारेकर गल्लीमध्ये काल रात्री घडला.

या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेत असणाऱ्या२४ शौचालय रात्रीतून पाडण्यात आली.विशेष म्हणजे हे शौचालय का पाडली याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. मात्र ही जागा अत्यंत मोक्याची असून याठिकाणी शौचालय अनेक वर्षांपासून बांधलेले होते आणि आसपास परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करत होते.

मात्र रात्रीतून अचानक असं काय झालं की शौचालय पाडण्यात आली. याआधीही असे अनेक शौचालय नगर शहरात रात्रीत गायब झालेले आहेत. त्याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. त्याजागी वेगळ्या इमारती उभ्या राहिल्या मात्र आता झारेकर गल्ली मधील शौचालय बाबत महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवक काय भूमिका घेते हे पाहण्याचे उचित ठरेल.






