अहमदनगर दि.२० डिसेंबर
शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केले होते.अटक केल्या नंतर त्यास वीस डिसेंबर पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते आज पुन्हा यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने विजय मर्दा यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून आर्थिक गुन्हे शाखेने विजय मर्दा यास आता दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी मागणी केली आहे त्यामुळे आता विजय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.






