Homeक्राईमपतीला ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्यांकडून आपल्या कुटुंबियांच्या जीविताला धोका मीना मोकाटे यांचे पोलीस...

पतीला ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्यांकडून आपल्या कुटुंबियांच्या जीविताला धोका मीना मोकाटे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन,मोकाटे प्रकरण वेगळ्याच वळणावर

advertisement

अहमदनगर दि.१७ डिसेंबर
हानीट्रॅप नगर शहराला काही नवीन राहिले नाही या ट्रॅप मध्ये गुंतवून पैसे उकळण्याचे प्रकार अनेकवेळा समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील एका अधिकाऱ्याला असेच ट्रॅप मध्ये गुंतवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्या अधिकार्‍याने थेट पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करून या ट्रॅपचा डाव उधळून लावला होता. यामध्येसुद्धा काही आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप काढण्यात आल्याचं समोर आले होते. याच प्रकारे काही वर्षांपूर्वी राहुरी मध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती.सध्या नगर तालुक्यातील जेऊर येथील गोविंदांना मोकाटे यांचे विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचारा बाबत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ अत्यंत गलिच्छ प्रकारचे असताना व्हिडिओ कुणी व्हायरल केले याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे. तसेच गोविंद मोकाटे यांना कुणी अडकवण्याचा प्रयत्न केला याबाबत त्यांच्या पत्नी मीना मोकाटे आणि त्यांचे बंधू सुंदर मोकाटे यांनी सविस्तर लेखी निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या अर्जामध्ये अनेक गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या असून गोविंद मोकाटे यांना गुन्हा दाखल होऊ पर्यंत पैशाची मागणी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आह.त्याचे सोशल मीडियावरील चॅटिंग पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करणे गरजेचे आहे.

तरच खरे आरोपी समोर येतील महिलांवर अत्याचार करणे हा गुन्हाच आहे मात्र महिलांचा वापर करून जर कोणी याचा फायदा करून घेण्यासाठी ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर तो ही महिलांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी अत्याचाराबाबत आणि ब्लॅकमेलिंग बाबत दोन्ही बाजूने तपास करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे मग गिविंद मोकाटे असतील किंवा अत्याचार पीडित तरुणी असे दोघांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. अत्याचार झाला असे फिर्यादीत म्हटले आहे त्या तारखेनुसार गोविंद मोकाटे हे एका विवाह निमित्त त्यांच्या कुटुंबीयांसमवेत होते त्यामुळे या बाबत मोकाटे यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियावरील सर्व संभाषणे ,चॅटिंग तपासणी करण्याची मागणी गोविंद कोकाटे यांच्या पत्नी केल्यामुळे या प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular