अहिल्यानगर दिनांक २६ जुलै
गरीबाच्या ताटातल्या अन्नाचा घास सध्या ओरबाडून घेतला जात असून. नगर शहरात एक मोठी साखळी हे काम करत आहे.रेशन धान्य काळाबाजार सुरू आहे. मात्र पुरावा हाती नसल्यामुळे पुरवठा विभाग कारवाई करत नसला तरी हा घोटाळा अत्यंत नियोजकपूर्वक खुलेआम सुरू आहे. धान्य वितरित केले आहे असे दाखवून ते धान्य खुल्या बाजारात अथवा पीठ तयार करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांना विकले जात आहे. विशेष म्हणजे सरकारने रेशन दुकानदारांच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ग्राहकांचे बायोमेट्रिक थंबनेल घेऊन धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पॉस मशीन ठेवण्यात आलेले आहेत. या मशीन वर ग्राहकांनी धान्य घेतले असल्याचे खोटेच दाखवून मोठा काळा बाजार करण्यात येत आहे. यासाठी सारस नगरचा हरबा’ल याने ही मशीन आणली असून त्याद्वारे सर्व दुकानदारांचे काम हा करून देत आहे. तर त्याला भिंगारचा एक जण चांगलेच साथ देत आहे.

तर दुकानदारांचे धान्य घेण्याचे काम “सकर “नामक व्यक्ती करत आहे. शहरातील दुकानदारांकडून धान्याचा माल विकत घेऊन तो नगर पुणे रोडवरील एका मिला विकला जातो.तसेच हे धान्य साठवण्यासाठी केडगाव इंडस्ट्रियल परिसरातील एक गोडाऊन आहे तर करपे मळा आणि मार्केट यार्ड मध्ये कांती चेंगेच्या गोडाऊन वर धान्याचा माल ठेवला जातो. या ठिकाणी जाऊन पुरवठा विभागाने आणि पोलिसांनी तपासणी केली तर निश्चितच तिथे काळाबाजार करून विक्री साठी घेतलेला धन्य साठा मिळू शकतो अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
माहिती नुसार काही ठराविक रेशन दुकानांना महिन्यातून विशिष्ट तारखेला ठराविक वेळेसाठी पॉस मशीन वापरण्याचा ऍक्सेस मिळत असल्याचा संशय आहे. त्या वेळात दुकानदार एका तासात 100 ते 150 कार्डधारकांना धान्य वितरण झाल्याचे नोंदी करतात, परंतु प्रत्यक्षात इतक्या मोठ्या संख्येने धान्य वितरण होणे शक्य नाही. त्यामुळे नकली डेटा रजिस्टर करुन सरकारी योजनांची फसवणूक होत असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात आहे. खासगी तसेच प्रशासकीय स्तरावर काही मोठ्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पॉस यंत्रणेचा मुख्य हेतू लाभार्थ्याला अचूक आणि वेळेवर धान्य प्रसारित करणे हा असतांना ही, त्याच मशीन मधून भ्रष्टाचार होण्यामुळे तो उद्देश अपयशी ठरत आहे. तर जे दुकानदार खरंच गोरगरिबांना इमानदारीने धान्य पुरवतात त्यांचे नावही अशा काही बोटावर मोजण्या इतक्या दुकानदारांमुळे आणि धान्य माफियांमुळे बदनाम होत चालले आहे.





