HomeUncategorizedदफन झालेले प्रेत आता पुरेना... पन्नास वर्षांपासून दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या जागेचा...

दफन झालेले प्रेत आता पुरेना… पन्नास वर्षांपासून दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या जागेचा मालक आता झाला जागा..मालक खरा की खोटा माहीत नाही.. मात्र दफन झालेले प्रेत ही आता उकरणार का ?

advertisement

अहिल्यानगर दिनांक 4 जुलै

नगर शहरात सुरू असलेल्या ताबेमारीचा प्रकार थांबता थांबेना असे झाले आहे. शहरातील आणि उपनगरातील जमिनींना सोन्या पेक्षा जास्त मोल आल्यामुळे सध्या बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी बळकावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.

Oplus_131072

नागापूर येथील 50 ते 60 वर्षांपासून दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या जागेचा मालक आता जागा झाला असून. दफन झालेले प्रेत उखडण्याचे काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

असाच प्रकार नगर शहरा लगत असणाऱ्या नागापुर
येथे उघडकीस आला असून आज नागापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर येऊन पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

मौजे नागापूर येथील मिळकत ९७६ व ९७७ ही ख्रिस्ती बांधवांची दफन भूमी असून अनेक वर्षापासून या परिसरात संपूर्ण जागेत दफन विधी झालेले आहेत. पूर्ण जागेमध्ये कोठेही जागा शिल्लक राहिलेली नाही आजही त्याचा वापर आजही दफन भूमी म्हणून होत आहे. मात्र आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर जागेची काही बेकायदेशीर रित्या खरेदी दाखवून श्रीपाद छिंदम याने अनाधीकृतपणे खरेदी घेतली असल्याची माहिती खिस्ती बांधवांना मिळाली आहे. या जागेभोवती संरक्षण म्हणुन ग्रामस्थांनी महानगर पालीकेमार्फत वॉल कंपाऊंड केलेले असुन महामार्गालगत रोडवर स्मशानभुमीत घाण, कचरा वगैरे होवु नये म्हणुन गेले कित्तेक दिवसापासुन पत्र्याचे कंपाऊंड घातलेले आहे. व त्या कंपाऊंड मुळे सदर जागेचे आम्ही संरक्षण करून ती जागा आम्ही आजपर्यंत सांभाळुन ठेवलेली होती. परंतु सदर जागे संदर्भात २ ते ४ दिवसापूर्वी श्रीपाद छिंदम याने काही ग्रामस्थांना एम.आ.डी.सी. पोलीस स्टेशनला बोलाऊन पोलीस स्टेशन समोर काही लोकांना दमदाटी करून लज्जास्पा वातावरण तयार करून माझी जागा आहे खाली करा नाहीतर तुमच्याकडे बघतो अशा जीवे मारण्याचा धमक्या दिल्या असल्याची तक्रार ख्रिश्चन बांधवांनी पोलिसांकडे केली आहे.

या जागेमध्ये आमचे पुर्वज पुरले आहेत त्यांची देखभाल करण्याकरीता आम्ही गेले १०० वर्षापासुन आजपोहोत हि जागा सांभाळुन ठेवलेली आहे. तरी बेकादेशीर झालेली खरेदी हि छिंदम यांची चौकशी होवुन सदर जागेची पाहणी करून ख्रिश्चन समाजाला योग्य ते न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच श्रीपाद छिंदम यांच्याकडून आमच्या जीविकास धोका असून त्यांच्यापासून आमचे संरक्षण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular