अहिल्यानगर दिनांक 12 ऑगस्ट
अहिल्यानगर शहरातील उद्योजक अफजल शेख यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी आयकर विभागाने छापा मारला. नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा छापा मारल्याच्या माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अफजल शेख यांचे माळीवाडा बस स्थानक शेजारील ACS कन्स्ट्रकशन या नावाने कार्यालय आहे त्या ठिकाणी आयकर विभागाचे पथक पोहोचले.या छापेमारीमुळे नगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अफजल शेख बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता आयकर विभागाचे 10 ते 12 अधिकारी चार वाहनांच्या ताफ्यासह माळीवाडा परिसरात दाखल झाले होते त्यामुळे सुरवातीला हा आयकर विभागाचा छापा आहे हे कोणाला कळले नव्हते त्यामुळे या परिसरात उलट सुलट चर्चेला आहे होते.
सकाळ पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेख यांच्या कार्यालयावर तळ ठोकला असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची कसुन तपासणी केली जात आहे.





