Homeक्राईमनगर मध्ये दहशत... कोयते,बंदूक, लाकडी दांड्याकाने तरुणाला जबर मारहाण... ज्येष्ठ माजी नगरसेवक...

नगर मध्ये दहशत… कोयते,बंदूक, लाकडी दांड्याकाने तरुणाला जबर मारहाण… ज्येष्ठ माजी नगरसेवक सह दंडावर गुन्हा दाखल..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 16 ऑगस्ट

झेंडीगेट परिसरात अबुताला अकिल शेख या तरुणाला नऊ जणांनी बेदम मारहाण केली असून लाकडी दांडके,कोयते ,बंदुकीचा वापर करून मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले शेख यांच्या फिर्यादीवरून झेंडीगेट परिसरातील माजी नगरसेवक नजिर अब्दुलरज्जाक जहागीरदार ऊर्फ नज्जु पहिलवान, इस्नान बशीर जहागीरदार, इम्तियाज जहागीरदार ऊर्फ आर डी एक्स ,रशिद अब्दुल जहागीरदार ऊर्फ रशिद दंडा, अकिब रशिद जहागीरदार,अश्रफ नदिम जहागीरदार, फैजान निसार जहागीदार, जिशान इम्तियाज जहागीरदार, मोईन आलम जहागीरदार यांच्या विरोधात बीएनएस. २०२३ चे कलम ११९(१), ११८(१), ११५(२), १२६(२), ३५१(२), ३५२ १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह आमं अॅक्ट ३/२५ प्रमाणे,कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oplus_131072

अबुताला अकिल शेख हे झेंडीगेट चौकातील नाझसाब चौकात मित्रांसोबत गप्पा मारत असताना माजी नगरसेवक नजू पैलवान आणि त्यांच्या साथीदारांनी
हातात बंदूक, लाकडी दांडके, कोयते घेऊन आज इसको छोडना नही इसका गेम कर देंगे असे असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून त्या ठिकाणी असलेले नागरिक घेऊन पळून गेले. मात्र इतर पाच सहा जण अबुताला अकिल शेख यांना बेदम मारहाण करत असल्याने अखेर चक्कर येऊन खाली पडले तेव्हा आरोपींपैकी अक्रिय रशिद जहागीरदार याने शेख यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून घेतली आणि हमारे खिलाफ खडा हो गया तो जानसे मार देंगे म्हणत ऑर्डर करत त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर अबुताला अकिल शेख यांचे काका फरमान नसिर शेख हे घटना घडली त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शेख यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular