Homeजिल्हासावधान... जिम मध्ये होतोय नशेच्या इंजेक्शनचा वापर... पोलिसांच्या कारवाईत भीषण सत्य आले...

सावधान… जिम मध्ये होतोय नशेच्या इंजेक्शनचा वापर… पोलिसांच्या कारवाईत भीषण सत्य आले समोर..

advertisement

अहिल्यानगर दिनांक १७ ऑगस्ट
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं भीषण सत्य उघडकीस आले असून शरीरयष्टी करण्यासाठी जिम मध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणींना नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडून शेकडो इंजेक्शन जप्त केले आहेत.

Oplus_131072

श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार एक महिला श्रीरामपूर येथे नदीच्या बॉटलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी सापळा रचला होता.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे कर्मचारी आंबादास आंधळे, मिरा सरग यांनी मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्या दुचाकीची तपासणी केली असता. मेफेटरर्मीन इंजेक्शनच्या (TERMIVA) 10 एम. एल. च्या, बेंच नं P5168 च्या 40 बॉटल, बेंच न P5287 च्या 10 सिलबंद बॉटल, अशा एकूण 50 सिलबंद बॉटल, गाडीच्या डिके मध्ये मिळून आल्या.

याबाबत अन्न औषध पुरवठा विभागाचे निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजेक्शन डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कुठेही विकले जाऊ शकत नाही शरीराला हानिकारक आणि अपायकारक असे हे गुंगीकारक औषध असून डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठीनुसारच याची खरेदी केली जाऊ शकते मात्र या महिलेकडे इतके इंजेक्शन कुठून आले याची चौकशी केल्यानंतर जीममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना व अन्य ग्राहकांना नशा करण्या करीता गणेश मुंडे आणि ती महिला शिल्पा शेळके विकत असल्याची कबुली तिने दिली. या इंजेक्शन ची किंमत 334.80 असताना 700 रुपयांना ती जिम मधील तरुणांना विकत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शिल्पा बापू शेळके, वय 25 वर्षे, 2) गणेश मुंडे, दोघे रा. गोंधवणी, श्रीरामपूर, यांचे विरुध्द बी.एन.एस. 2023 चे कलम 123, 125, 278, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा औषधाच्या वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यास व जिवीतांस हानी होण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधामध्ये MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP असुन सदर औषधाचा उपयोग हा कमी रक्तदाबामध्ये केला जातो तसेच त्याचा गैरवापर हा शारीरक क्षमता वाढविण्यासाठी होतो. सदर औषधाचा दुष्परिणाम DROWSINESS, HALLUCINATIONS, CONVULSIONS हा आहे. सदर औषध हे डॉक्टराच्या सल्याशिवाय तसेच निगरानी शिवाय घेतल्यास ग्राहकाच्या आरोग्यास धोका निर्माण होवुन जिवीतास हाणी होवु शकते अशी माहीती अन् व औषध अधीकारी मुळे यांनी दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक मेंढे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular