Homeशहरमोठी बातमी! अहिल्यानगर महापालिकेची निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना या दिवशी जाहीर होणार..

मोठी बातमी! अहिल्यानगर महापालिकेची निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना या दिवशी जाहीर होणार..

advertisement

नगर दिनांक ३ सप्टेंबर

गेल्या काही काळापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केलं आहे. अशातच आता राज्यातील महत्वाच्या महापालिकांनी आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. तर काही महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

Oplus_131072

सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेत चार नगरसेवकांचे एक प्रभाग अशी रचना होती. त्यामुळे आता चारच नगरसेवक राहणार असून असून त्यामध्ये मात्र प्रभाग रचनेत बदल होणार आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेत 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 68 नगरसेवक निवडून आले होते यामध्ये शिवसेना 24, राष्ट्रवादी काँग्रेस 18 ,भाजप 14 ,बसपा चार, समाजवादी पक्ष एक, अपक्ष पाच असे पक्षीय बलाबल होते.

2018 नंतर थेट आता 2025 मध्ये निवडणुका होणार असून महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपून वर्ष होऊन गेले आहे. त्यामुळे सर्वांना आता निवडणुकीचे वेध लागले असून त्यासाठीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने राबवली असून. अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना चार सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी एक महिना मुदत मिळणार आहे. त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध होतील आणि पुढे निवडणूक प्रक्रिया सुरू राहील. मात्र तरीही निवडणुकांसाठी 2026 वर्ष उजाडेल अशी माहिती जाणकारांकडून मिळत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular