अहिल्यानगर दिनांक १३सप्टेंबर
ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी गणेश हुच्चे यास नगराच्या जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी पाहुणचार मिळत असल्याची तक्रार कृष्णा भागानगरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांडे निवेदनाद्वारे केली असून या बाबतचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत.

कृष्णा भागानगरे हे दहा सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय येथे मित्राला भेटण्यासाठी गेल्या असताना त्यावेळी त्यांना वाढ नंबर सहा मध्ये ओंकार भागानगरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला गणेश हुच्चे दिसून आला. धक्कादायक बाब म्हणजे तो राजेशाही थाटात कॉटवर बसून मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी त्याला ना कसले सलाईन लावण्यात आले होते ना आरोपी असल्यामुळे हातात बेड्या घातलेल्या आढळून आल्या नाहीत. भगंदर झाले म्हणून त्या उपचारास अन्यथा आल्याची माहिती कृष्णा भागानगरे यांना पोलिसांनी दिली. आरोपी मोकळा कसा सोडला याबाबत पोलिसांना विचारणा केल्यानंतर गणेश हुच्चे याला बेड्या घालण्यात आल्या. तसेच गणेश हुच्चे याने मद्यपान केल्याचा संशय आल्यामुळे त्याच्या रक्ताची तपासणीची मागणी ही कृष्णा भागानगरे यांनी केली. त्या नंतर आरोपीची रक्त तपासणी करायला घेतले.
विशेष म्हणजे गणेश हुच्चे याच्या बरोबर अमोल येवले हा देखील उपस्थित होता अमोल येवले हा तोच आरोपी आहे ज्या ने स्वतःचे खोटे आयडी बनवून अमोल केरप्पा हुच्चे असे तयार करून वारंवार सब जेलमध्ये भेटायला जात होता, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग करत असल्यामुळे गणेश हुच्चे याने आपला कडील मोबाईल अमोल येवले यांच्याकडे दिला. अमोल येवले कडून कृष्ण भागानगरे यांनी मोबाईल घेऊन त्यातील कॉल डिटेल तपासले असता गणेश हुच्चे तीन वर्षापासून जेलमध्ये असून देखील पोलिसांसोबत त्याचे आजही मधूर संबंध आहेत.या सर्व प्रकारचे व्हिडिओ शूटिंग कृष्णा भागानगरे यांनी आपल्या मोबाईल मध्ये करून घेतले असून सर्व पुरावे अपर पोलीस अधीक्षक कुलबर्गे यांना देण्यात आले आहेत.
10 सप्टेंबर रोजी घटना घडल्यानंतर घटना दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर डावरे यांनी कृष्णा भागानगरे यांना फोन करून झालेला प्रकार दाबून टाका मी त्याला परत जेलमध्ये पाठवून दिले आहे. या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका असे म्हणून फोन कट केला याचे फोन रेकॉर्डिंग पोलिसांना देण्यात आले आहे.
गणेश हुच्चे हा मोठा गुन्हेगार असून त्याचे अनेक अवैध धंदे होते त्यामुळे त्याचे पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्यामुळे त्याचा उपयोग करून घेऊन जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांना पैसे देऊन तो जिल्हा रुग्णालयात ऍडमिट होऊन मौज मजा करत असतो व आपले नेटवर्क जिल्हा रुग्णालयातून चालवत असतो त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी करावी गणेश हुच्चे याच्याजवळ सापडलेल्या मोबाईलची डिटेल काढून तो कोणाकोणाच्या संपर्कात होता त्या सर्वांवर कुठून कारवाई करावी अशी मागणी निवेदनात कृष्णा भागानगरे यांनी केली आहे.
या प्रकरणाचा तपास करून लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी अन्यथा हिंदू संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिगंबर गेंट्याल यांनी दिला आहे.





