अहिल्यानगर दिनांक 17 सप्टेंबर
अहिल्यानगर शहरात कुठला स्टॅन्ड परिसरात ईदगाह मैदानासमोर काल दुपारच्या सुमारास गोवंशिय जनावरांची कत्तल करून त्यांचे अवशेष फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली होती. यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी ईदगाह मैदानासमोर रस्ता रोको आंदोलन करून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती.

अनेक वेळा निवेदन देऊनही आणि सरकारने गोवंश जनावरांची कत्तल करू नये म्हणून कायदा आणूनही गोवंशय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे प्रकार नेहमीच समोर येत आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा तालुक्याचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. जवळपास एक तास चाललेल्या रस्ता रोको नंतर पोलिसांनी आणि महापालिका आयुक्तांनी आरोपींना अटक करून शहरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला होता.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही च्या माध्यमातून शोध घेऊन माउस फेकून देणारी मोपेड गाडी शोधून काढली त्यानंतर ही गाडी झेंडीगेट येथील तरबेज आबीद कुरेशी या तरुणाची असल्याची माहिती समजतात पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन गोवंश बैलांची कत्तल केल्याची कबुली दिली तसेच उरलेले मांस टाकून देण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांचा वापर केल्याची ही कबुली दिली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी आणि गुन्हे शाखेचेपोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकॉ शाहीद शेख, पोहेकॉ फुरखान शेख, पोना भिमराज खर्से, पोकॉ सतिष भवर, पोकॉ योगेश कर्डीले, पोकॉ प्रशांत राठोड, मपोहेकॉ/ भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ छाया माळी, यांनी केली.





