अहिल्यानगर दिनांक 28 ऑक्टोबर
नगर शहरातील कोरोना काळात मर्जी विरुध्द अॅडमीट करुन घेणे त्या ठिकाणी रुग्णाच्या जीवितास धोका होईल याची माहिती असताना सुधा अतिरिक्त जास्तीचा औषधाचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, अवाजवी अवास्तव बिल रक्कम आकारणे, शरीराच्या अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे. अशा प्रकारच्या आरोपाखाली अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात अशोक खोकराळे यांच्या फिर्यादी वरुण डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधिर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, आणि डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल मधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून २० ऑक्टोबर रोजी डॉक्टर सुधीर बोरकर आणि डॉक्टर गोपाळ बहुरूपी यांनी कोर्टात जमीन अर्ज दाखल केला होता.त्या अर्जावर २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावत पोलिसांना नोटीस काढत २८ ऑक्टोबर रोजी नियमित न्यायालया समोर उपस्थित राहण्याचे सांगितले होते.

मात्र आज या प्रकरणात ट्विस्ट आला असून डॉक्टर सुधीर बोरकर आणि डॉक्टर गोपाळ बहुरूपी यांनी आपल्या वकिलांच्या वतीने जमीन अर्ज काढून घेतला आहे.
२० ऑक्टोबर रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी दोन डॉक्टरांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र त्याच दिवशी फिर्यादी अशोक खोकराळे यांना थेट न्यायालयासामोर जाऊन स्वतः बाजू मांडत मलाही याप्रकरणी बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यांची विनंती मान्य करून 21 ऑक्टोबर रोजी न्यायालयात आरोपींचे वकील आणि फिर्यादी अशोक खोकराळे यांचा युक्तिवाद झाला. जवळपास एक ते दीड तास युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही डॉक्टरांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आज नियमित न्यायालयात काय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र डॉक्टरांनी आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पोलीस आता आरोपींना पकडण्यासाठी काय करणार याकडेच संपूर्ण नगर शहराचे लक्ष लागून आहे.





