अहिल्यानगर दिनांक ८ नोहेंबर
संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघडकीस आल्याची माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या कटाचा मुख्य सुत्रधार धनजंय मुंडे याला अटक करून, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी विशेष तपास पथक नेमून करण्यात यावी. तसेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरुपाचा असून जनतेमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडे करण्यात आली.

या वेळी मिलिंद जपे,परमेश्वर पाटील, अभय शेंडगे, वैभव भोगाडे, नगरसेवक मदन आढाव, दिलीप कोल्हे, गणेश नाईकनवरे, प्रमोद कोरडे, रत्नाकर दरेकर, अशोक पवार, श्रीपाद दगडे, गुंजाळ साहेब, रमेश मुंगसे, भारत भोसले, एडवोकेट अनुराधा येवले, कांताताई बोठे, मीनाक्षीताई वागस्करआदी उपस्थित होते.





