अहिल्यानगर दिनांक 9 नोव्हेंबर
देशात सध्या दुबार मतदारांची नावे आणि बोगस मतदारांची नावे यावरून गदारोळ उठला असतानाच आता अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मतदार यादीचे तयार करण्याचे काम थेट भाजपा पदाधिकारी दिल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी थेट राज्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिकेच्या कारभारातील गलथानपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अतिरिक्त येणाऱ्या प्रभाग निहाय्य मतदारांच्या याद्या तयार त्यांचे एकत्रीकरण करून छपाई करण्याचे संवेदनशील काम थेट भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात तात्काळ राज्य निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकिय पद्धतीने कारभार सुरू असून त्यात अनेक तक्रारी वेळोवेळी पुढे येत आहेत. मतदार याद्यांच्या प्रक्रियेत तर देशभरातच गोंधळाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरात भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडेच मतदार माहितीची गोपनीय यादी तयार करण्याचे काम दिल्याने या प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असा आरोप नितीन भुसारे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी महानगरपालिकेला व संबंधित विभागांना बीएलओ नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार तपशील तसेच नव्याने १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांची नावे समाविष्ट करण्याची जबाबदारी बीएलओंवर होती. प्रत्यक्षात ही संपूर्ण माहिती एकत्र करून ती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याचे काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच करणे आवश्यक होते. मात्र नियम धाब्यावर बसवत, मागील महिनाभरापासून भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यानेच मतदार यादी तयार करण्याचे कामव छपाई करण्याचे काम होत असल्याची माहिती प्रकाशात आली आहे. त्यामुळे शहरातील महायुतीतील इच्छूक, उमेदवार तसेच भाजपाचे तसेच विविध पदाधिकारीही त्या व्यक्तीच्या संपर्कात आहेत संपर्कात असल्याचा पुरावा हा भाजप पदाधिकारी असलेला भुजबळ व त्यांचा मुलगा यांच्या कॉल डिटेल्स तसेच सीडीआर तपासणी करून चौकशी करावी यातून सर्व बाबी उघड होतील. यामुळे मतदार यादी प्रक्रियेतील गोपनीयता धुळीत मिळाल्याचा नितीन भुतारे यांचा आरोप आहे. “ही माहिती कोणत्याही व्यक्तीकडे पोहोचणे म्हणजे भविष्यात दबावाचे, सौदाबाजीचे किंवा भ्रष्टाचाराचे दार खुले ठेवणे होय. प्रशासनाने यामध्ये गंभीर दुर्लक्ष केले असून हा प्रकार थेट मतदार यादीत भ्रष्टाचार व फेरफार केला जात आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित १६ नोव्हेंबर ला प्रारूप मतदार यादी ग्राह्य धरू नये पुन्हा नवीन मतदार यादी तयार करावी तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे मतदार यादी तयार करणे छपाई करणे हे काम भाजप पदाधिकारी व त्यांच्या मुलाला दिले अश्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नितीन भुतारे यांनी केली आहे





