अहिल्यानगर दिनांक २४ नोहेंबर
अहिल्यानगर शहरात बाहेर गावावरून शहरात येऊन स्पा सेंटर चालवणाऱ्यांची संख्या वाढत असून यामुळे तरुण वर्ग यात वहावत चालला आहे. स्पा च्या गोंडस नावाखाली अनेक ठिकाणी भलतेच उद्योग या सुरू आहेत.
नगर शहरातील पाईपलाइन रोड हा उच्च भ्रु वस्तीचा तसेच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक भाग म्हणून ओळखला जाऊ लागला असून याच रोडवर असणाऱ्या एकविरा चौका जवळ काही महिन्यांपूर्वी एका स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून तिथे सुरू असलेल्या अवैध्य धंद्याचा पर्दाफाश केला होता.

आता पुन्हा पाईपलाईन रोड एकविरा चौक जवळ असणाऱ्या एका ट्रेडर्स शेजारी “निर्वा स्पा सेंटर” सुरू झाले असून “हुल बाग” याच्या अधिपत्याखाली हे सेंटर सुरू आहे. येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेगळाच खेळ अनेकांचे खिसे रिकामे करत असून तरुणाई या ठिकाणी चांगलीच रेंगाळताना पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अशाच सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी स्पा सेंटरच्या मॅनेजरला नगर पोलिसांनी अटक केली होती.
पाईपलाईन रोड हा अत्यंत नावाजलेला भाग असून अनेक प्रतिष्ठित नागरिक या परिसरात राहतात.अनेक क्लासेस ,शाळा ,या भागात आहेत मात्र या स्पा मुळे अनेक तरुण आकर्षित होऊन त्यांचे पाय स्पच्या दिशेने वळू लागले आहेत ते थांबवणे गरजेचे आहे.
मात्र खरोखरच जे लोक स्पा सेंटर खरोखरच व्यवस्थित चालवतात आलेल्या ग्राहकांना समाधान होईल अशी सेवा देत असतील त्याचे नाव अशा काही पैसे कमावणाऱ्या नको ते धंदे करणाऱ्या लोकांमुळे बदनाम होत आहे.





