अहिल्यानगर दिनांक १० डिसेंबर
अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी तीन जणांवर विना परवाना सभा घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील क्र.डीसी/कार्या 9 ब 1/2349/2025 आदेशान्वये दिनांक 08/12/2025 रोजीचे 00.01 वा.ते दिनांक 21/12/2025 रोजीचे 24.00 वा.पावेतो अहिल्यानगर जिल्हयाचे स्थळसीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करुन सादिक शेख, शाहरुक हसन शेख रा.संजीरी चौक,मुकुंदनगर,अप्पु शेख रा.वाबळे कॉलनी,शेहबाज सय्यद रा.फकिरवाडा, नाजीश सय्यद रा.वाबळे कॉलनी,उमेद सय्यद रा.नशेमन कॉलनी यांनी विना परवाना सभा घेतली आहे. म्हणुन कॅम्प पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता कलम 223 सह महाराष्ट्र पोलीस अधि. 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.




