अहिल्यानगर दिनांक 13 डिसेंबर
अहिल्या नगर शहरात सलग दोन दिवस पोलिसांना मारहाण आणि धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याच्या घटना नगर शहरातील तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांना आपल्या खाकी वर्दीचा रुबाब दाखवण्याची गरज आली असून नागरिक जर खुलेआमपणे पोलिसांवर हात उचलून कायद्याचा भंग करत असेल तर कायदा सुव्यवस्था बिघडण्यास वेळ लागणार नाही.

तोफखाना पोलीस स्टेशन मधील दोन कर्मचाऱ्यांना कल्याण रोडवरील रेल्वे पुलावर मारहाण करण्यात आली. काहीजणांनी ते पोलीस असल्याचे ओळखून मारहाण करणाऱ्या तरुणांना सांगण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्या मारहाण करणाऱ्या तरुणांनी आपण ज्यांना मारत आहोत ते पोलीस आहेत हे समजून सुद्धा त्यांना कशाचीच भीती वाटली नाही. त्यामुळे वर्दीचा धाक कमी झाला आहे का?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
या मारहाणीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी काही आरोपींना पकडले आहे. मात्र अशा टोळक्यांना जरब बसेल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दुसरी घटना कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून भोसले आखाडा येथे भोसले लॉनचे पाठीमागे डी. जे चालू असून काही तरुण धांगडधिंगा करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. रात्री साडेअकरा वाजले असल्यामुळे डीजे बंद करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी भोसले आखाड्याचे पाठीमागे भोसले लॉन येथे गेले असता तेथे काही लोक डिजेवर नाचत होते. सर्वांना पोलिसांनी विनंती करून डीजे बंद करावा असे सांगितले मात्र नाचणारे तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते एवढेच नव्हे तर एका तरुणीने मोबाईलचे शूटिंग रेकॉर्ड चालू करून मी तुमचे रेकॉर्ड करत आहे हे सर्व माझ्या भावाला दाखवले तर तो तुम्हाला सोडणार नाही अशी धमकीही पोलिसांना दिली. डी.जे चालक विकी माने याने सुद्धा पोलिसांना अरेरावी करून त्या ठिकाणी असलेल्या महिला व पुरुषांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. अखेर पोलिसांनी बाळाचा वापर करून डीजे बंद करत याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात लोकांसह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस गुन्हे दाखल करतात पुढे ते खूप दिवसांनी न्यायालय जातात मात्र न्यायालयात गेल्यानंतर ते गुन्हे टिकतात का ? किंवा कायद्याचा फायदा घेऊन गुन्हेगार मोकळे होतात. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याची जरब कमी होत चालला असून त्यामुळे पोलिसांवर थेट हात उचलण्याची हिंमत आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. खाकी वर्दी दिसली तरी लांब लांब पळणारे गुन्हेगार आता पोलिसांवर हात उचल असतील तर पोलिसांनाही आत्मपरीक्षणाची गरज आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याप्रकरणी आता गंभीरपणे लक्ष देऊन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.हातात दांडा घेऊन कायदा मोडणाऱ्यांचा करण्याची गुन्हेगारीचा हंडा फोडण्याची सध्या गरज आहे. नाहीतर असे चालू राहिले तर पोलिसांचा धाक कमी होईल आणि गुंडांचा त्रास जास्त होईल.
सध्या नाशिक आणि पुणे येथे पोलिसांनी चांगली मोहीम राबवली आहे कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी स्लोगन देऊन नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना चांगलेच वठणीवर आणले आहे. तसेच अनेक गुन्हेगारांची ज्या ठिकाणी गुन्हा दहशद केली आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांची दहशत मोडेल यासाठी गुंडांना नागरिकांसमोर रस्त्यावर फिरवून गुंडांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रकारे आता नगर पोलिसांनी काम करण्याचे गरजेचे असून कायद्याचा बालेकिल्ला नगर जिल्हा होण्यासाठी गुंडांची धिंड काढण्याची गरज आहे.




