Homeराजकारणआमदार संग्राम जगताप यांची एक्स्प्रेसस सुसाट... महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते...

आमदार संग्राम जगताप यांची एक्स्प्रेसस सुसाट… महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते घेणार हाती घडयाळ

advertisement

अहिल्यानगर दिनांक २२ डिसेंबर

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षात इन्कामिंग, आउटगोइंग सुरू झालं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी ने दोन दिवसांपूर्वी नगरमधे मेगा प्रवेशाचे आयोजन केलं होतं ज्यामध्ये बोल्हेगाव भागातील बाबासाहेब नागरगोजे यांनी हाती घड्याळ घेतलं. अवघ्या २४ दिवसांवर अहिल्यानगर महापालिकेचे निवडणूक आल्यामुळे आता आजी माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी जिकडे आपल्याला निवडून देण्याची जबाबदारी जो पक्ष देईल तिकडे जायची तयारी करत आहेत किंबहुना प्रवेश सुद्धा करून घेत आहेत. सध्या महायुती असणाऱ्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडे म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांच्याकडे इन्कामिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Oplus_131072

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अहिल्यानगर मध्ये राष्ट्रवादी ,भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे तर अजूनही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अश्यातच अहिल्यानगर मधील ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी असलेले किशोर डागवाले हे त्यांच्या पुत्र रोहन सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. जेष्ठ नगरसेवक आणि मूळचे शिवसैनिक असणारे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजविणारे आणि नंतर भाजपा मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील आठवड्यात अजूनही काही धक्के आमदार संग्राम जगताप इतर पक्षांना देणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular