Homeविशेषनिवडणूक लागली आणि केडगावकरांना आठवला तो 7 एप्रिल 2018 चा अंगावर काटा...

निवडणूक लागली आणि केडगावकरांना आठवला तो 7 एप्रिल 2018 चा अंगावर काटा आणणारा दिवस…

advertisement

अहिल्यानगर दिनांक २६ डिसेंबर

केडगाव म्हणजे पुण्याकडून येताना अहिल्यानगर शहराचा सर्वप्रथम दिसणारा हा भाग. याच केडगावमध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल 2018 रोजी केडगाव मधील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

Oplus_131072

आता या घटनेची पुन्हा आठवण केडगावकरांना होत असून कारण आता महानगर पालिकेची निवडणूक लागली आहे.मात्र आजही 2018 मधील घटनेच्या आठवणींनी केडगावकरांच्या अंगावर काटे उभे राहतात.त्या घटनेची दहशत आजही इथे जाणवते

अहिल्यानगरच्या (पूर्वीचे अहमदनगर ) केडगावमधील 32 ब वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काटे की टक्कर झाली होती. पोटनिवडणूक असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेतील मतांमधलं अंतर अगदी कमी होतं. मागील निवडणुकीचा लीड जवळपास 1,133 वरून ते 434वर आला होता . निवडणुकीत विजय मिळाला तरी येथील साम्राज्याला आणि त्यांच्या वर्चस्वाला मिळालेली टक्कर आणि मागील वाद हे या हत्याकांडाला कारणीभूत ठरले का? हा प्रश्न आहे.

महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून खून झालेले मृत संजय कोतकर हे 30 वर्षांपासून शिवसेनेचं काम करत होते. केडगाव भागात शिवसेनेची पाळंमुळं रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता हे स्थानिक केडगावकरांना माहित आहे

त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत केडगावकरांनी संजय कोतकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या पत्नीला भरघोस मताने महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. आता पुन्हा एकदा निवडणूक जाहीर झाली असून केडगावकर या निवडणुकीत कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण दहशत सामान्य केडगावकर यामध्ये ही निवडणूक होणार आहे केडगावकर आजही 2018 चा तो थरारक दिवस विसरले नसतील हे नक्कीच…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular