अहिल्यानगर दिनांक 1 जानेवारी
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आता उरले फक्त 14 दिवस त्यामुळे उमेदवार आता प्रभागात पायाला भिंगरी लाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून सुमित संतोष वर्मा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमित वर्मा हे सुद्धा प्रभागात सध्या चांगला झंजावत प्रचार करत आहेत..

सुमित वर्मा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष असून जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे अनेक कामे मार्गी लावले आहेत. त्याचप्रमाणे वाघ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल केले आहेत.
विकासाचे व्हिजन आणि राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले सुमित वर्मा यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कमी काळात नगर शहरात आपला नावलौकिक कमावला आहे. मात्र जनतेची सेवा करण्याचे माध्यम म्हणून नगरसेवक होणे गरजेचे असल्याने त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेमध्ये मोठा व्यवसाय असूनही त्यांनी समाजकारणाला प्रथम महत्त्व दिले आहे.
शहरातील विविध प्रभागातील समस्यांचा पाठपुरावा करताना त्यांनी फक्त विकास हाच विषय डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 मधून आपल्या विकास व्हिजनच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी एक वेळा संधी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे कशी विकासाच्या दिशेने सुसाट निघेल ते नगरकर पाहत राहतील असा विश्वासही सुमित संतोष वर्मा यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांची संपर्क साधताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील सर्वच पक्षातील नगरसेवकांचा अनुभव घेतलेल्या मतदारांनी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकाचा आणि कामाचा अनुभव घेऊन पाहावा अशी विनंती त्यांनी मतदारांना केली आहे.





