अहिल्यानगर दिनांक 22 जानेवारी
अहिल्यानगरचे महापौरपद हे ओबीसी महिलांसाठी राखीव झालं आहे. त्यामुळे अहिल्यानगरचा पुढच्या महिला महापौर कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी सुद्धा अनेक महिला नगरसेविकांनी अहिल्यानगर महापौरपद भूषवलं आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई अशी तीन पक्षांची महायुती होती.

आज राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात अहिल्यानगरचे महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीकाँग्रेस-भाजप महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे 52 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 34 आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागा मिळत एक नंबरला तर भाजप 25 जागा मिळत दोन नंबरला आहे त्यामुळे अहिल्यानगरचे महापौरपद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित आहे.
आतापर्यंत सातत्याने महायुतीचा महापौर बसेल असं सांगितलं जात होतं. कारण महापौरपदाची आरक्षण सोडत बाकी होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापौरपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. कारण त्यांच्याकडे नगरसेवक जास्त असून ओबीसी महिलांमधून अनेक नगरसेविका निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी कडे अशा अनेक सक्षम महिला नगरसेविका आहेत. महापौरपदासाठी त्यातल्या काही नावांची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर पदाचे दावेदार कोण?
१)दीपाली बारस्कर
२)संध्या पवार
३)ज्योती गाडे
४)सुजाता पडोळे -राष्ट्रवादी
५)वर्षा काकडे-राष्ट्रवादी
६)अश्विनी लोंढे-राष्ट्रवादी
७) सुनीता फुलसौंदर (राष्ट्रवादी )
८)अशा डागवाले (राष्ट्रवादी )
या संभाव्य आठ नगरसेविकांपैकी दिपाली बारस्कर या तीन वेळेस नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्क्याने अहिल्यानगर महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत संपूर्ण 68 नगरसेवकांपैकी सर्वात जास्त मताधिक्याने दिपाली बारस्कर या प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आल्या आहेत.त्यामुळे वरिष्ठ नगरसेवक म्हणून त्यांच्या काळात महापौर पदाची पडू शकते अशी शक्यता वर्तवली जाते मात्र आता महापूर पद आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेणार की भाजप घेणार यानंतरच महापौर पद कोणाला जाणार याची माहिती समोर येणार आहे.येत्या दोन दिवसात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीची बैठक होणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितला आहे. आणि त्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याचीही त्यांनी सांगितले असल्यामुळे आता महापौर पदासाठी इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून निर्णयाचे वाट पाहत असतील.





