अहिल्यानगर दिनांक 25 जानेवारी
अमली पदार्थांचा विळखा देशाचे नुकसान करत आहे. तरूण पिढीच त्यामुळे उद्ध्वस्त होत असून आता या गुन्हेगारांनी महाविद्यालयीनच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळतोय हे अधोगतीचे द्योतक मानले जाते. सुरूवातील मुलांना हुंगण्यासाठी पावडर आणि पाण्यातून नशेच्या गोळ्या दिल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने याच मुलांचे व्यसन पराकोटीला जाते. व्यसनाधीन झालेल्या मुलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत वाईट अवस्था होते.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार रेल्वे, रस्ते, कुरीअर, तसेच परदेशातून कंटेनरद्वारे राज्यात विविध शहरात ड्रग्जची तस्करी होत असून, ऑनलाईनच्या माध्यमातून देखिल ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. परिणामी तस्करांसह नशेखोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तरूणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
अहिल्यानगर मध्ये महानगर निवडणुकीच्या धामधुमीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून जवळपास सात तरुणांनी हे नशेचे पदार्थ घेतले होते. त्या तरुणांना ओवर डोस झाल्यामुळे अक्षरशः ते मृत्यूच्या दारात जाऊन पुन्हा परत आले आहेत अशी परिस्थिती त्या तरुणांची झाली असून . एमआयडीसी परिसरात असलेल्या बोल्हेगाव भागात हा प्रकार घडला असून यामध्ये काही त्रास होऊ नये म्हणून त्या तरुणांच्या कुटुंबीयांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र खाजगी रुग्णालयात या सातही तरुणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यांची अवस्था अत्यंत गंभीर होती मात्र डॉक्टरांच्या उपचारानंतर हे तरुण बरे झाले आहेत. थोडा जरी उशीर झाला असता तर सातही तरुणांचा मृत्यू झाला असता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र सात तरुणांपैकी एकाने ही नशा केली नसल्यामुळे त्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्याने तातडीने सर्व तरुणांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र हे नशेचे पदार्थ आले कुठून या तरूणांना दिले कोणी याबाबत आता तपास होणे गरजेचे आहे. कारण हा प्रकार जरी दाबला गेला असला तरी नशेच्या पदार्थ पदार्थ विकणारे तस्कर अजूनही मोकळेच आहेत. त्यामुळे एमआयडीसी पोलीस किंवा जिल्हा पोलीस दलाने याप्रकरणी गंभीर दाखल घेऊन ड्रग्स तस्करी करणाऱ्या टोळीचा परदा फाश करणे गरजेचे आहे. नाहीतर शहरात हळूहळू ही नशेची व्याप्ती वाढत जाईल.





