Homeजिल्हाएफआरपी थकवल्याने शेतकऱ्यांचे श्री साईकृपा शुगर कारखान्या समोर उपोषण सुरू

एफआरपी थकवल्याने शेतकऱ्यांचे श्री साईकृपा शुगर कारखान्या समोर उपोषण सुरू

advertisement

अहमदनगर दि.१७ फेब्रुवारी

आष्टी तालुक्यातील मौजे रुई नालकोल, नांदा, सराटे वडगाव, कानडी, सह तालुक्यातील शेतकरी  मंगळवार पासून साई कृपा कारखान्याच्या समोर आमरण उपोषणास बसलेले असून कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीप्रमाणे पेमेंट जमा केल्याशिवाय आपल्या कारखान्याच्या समोरून आम्ही उठणार नाही असा पवित्रा उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आष्टी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी 2018-19 च्या गळीत हंगामात श्रीगोंदयाच्या श्री साईकृपा सुगर अँड अलाईस इंडस्ट्रीज  या कारखान्यात आष्टी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी ऊस घातला होता सरकारी नियमानुसार पंधरा दिवसात एफ आर पी नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित व बंधनकारक होते परंतु असे असताना आजपर्यंत एफ आर पी नुसार उसाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याने आणि वारंवार कारखान्यास प्रत्यक्ष भेटी देऊनही पैसे न देताच चालू हंगामात कारखाना सुरू करून शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही न देता शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. व आता शेतकऱ्यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. या मुळे शेतकऱ्यांना पर्यायाने नाईलाजास्तव संबंधित कारखानाच्या समोर उपोषण करावे लागले असल्याचा आरोप उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे या उपोषणाच बुधवारी दुसरा दिवस असून कारखान्याने त्वरित एफ आर पी प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषण करत्या शेतकर्‍यांनी घेतला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular