Homeक्राईमजलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांची प्रकृती स्थिर उपचार...

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांची प्रकृती स्थिर उपचार करणाऱ्या डॉक्टर सतिश सोनवणे यांनी दिली ही माहिती

advertisement

अहमदनगर दि.२३ एप्रिल सुशील थोरात

राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे सोनई परिसरातील काम पाहत असलेले स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे ही घटना घडली असून या प्रकरणी जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्धन राजळे यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा), बबलु लोंढे, संतोष भिंगारदिवे (दोघेही रा. घोडेगाव, ता. नेवासा), ऋषिकेश वसंत शेटे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जुन्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समजली आहे.पोलीसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलीय

पहा व्हिडिओ- मनोज पाटील पोलीस अधीक्षक

राजळे हे सोनई येथील काम अटोपून घोडेगावमार्गे आपल्या घरी मोटारसायकलवरुन निघाले होते. राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच पांढर्‍या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या आरोपींनी राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबारात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे. जखमी अवस्थेत स्वीय सहाय्यक राजळे यांना रात्रीच अहमदनगरच्या मॅक केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं मॅक केअर हॉस्पिटलचे डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितलय.

डॉ.सतीश सोनवणे पहा व्हिडीओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular