Homeराजकारणजिल्हा रुग्णालय आगी बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सिव्हिल सर्जन सुनील पोखरणा...

जिल्हा रुग्णालय आगी बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सिव्हिल सर्जन सुनील पोखरणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा – विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची मागणी

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर मधील जिल्हा शासकीय रुग्णलयात लागलेल्या आगीला जबाबदार धरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे . पोलिसांनी दबावाखाली फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली का असा प्रश्न निर्माण होतोय. राज्यातील फायर ऑडिटेर बाबत 337 रुग्णालयाचे अंदाजपत्रक पाठवले असताना अद्याप एकही रुग्णालयाचे काम सुरू नाही.आगी च्या संदर्भात एक खिडकी योजना असावी तरच लवकरात लवकर कामे होतील प्रस्तवा या विभागाकडून त्या विभागाकडे जातो आणि कामे खोळंबतात. जिल्हा रुग्णालयात सध्या icu बंद असून तो तातडीने सुरू करावा आणि जिल्हा नियोजन समितीकडे जे प्रस्तवा असतील ते लवकरात लवकर मंजूर करावे अशी विनंती मी पालकमंत्र्यांना करेल असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय. प्रवीण दरेकर यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली तसेच परिचारिका आंदोलनास भेट देऊन आम्ही तुमच्या पाठीशी असून ज्या परिचरिकाना या घटने बाबत दोषी धरून गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या बाबत आम्ही सरकारला जाब विचारू असे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी परिचारिकांना दिले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular