आंतरराष्ट्रीय – २७ एप्रिल
पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा आत्मघाती स्फोट झाला होता. एका महिलेने विद्यापीठाच्या गेटजवळ स्वतःला उडवले, यात तीन चीनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. याचे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून महिलेने रिमोट द्वारे स्वतःला उडवले आहे.
पहा व्हिडीओ
दरम्यान, त्या महिलेच्या पतीच्या पतीचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. त्याने पत्नीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. कराची विद्यापीठातील चायनीज सेंटरजवळ स्वत:ला उडवणारी महिला उच्चशिक्षीत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने MSc झूलॉजीचे शिक्षण घेतले असून, सध्या ती M.Phil करत होती. तसेच, तिचा नवराही पेशाने डॉक्टर आहे. या महिलेला 8 आणि 4 वर्षांची दोन मुलेही आहेत.






