मुंबई दि.२७ एप्रिल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.





