Homeक्राईमनांदेड जिल्ह्यातील खुन करून पसार झालेली टोळी श्रीगोंदा येथे जेरबंद अहमदनगर पोलीस...

नांदेड जिल्ह्यातील खुन करून पसार झालेली टोळी श्रीगोंदा येथे जेरबंद अहमदनगर पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई…

advertisement

.श्रीगोंदा  दि.२९ ऑक्टोबर :-

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी गावात मन्मथ इरवंत धोंडापुरे याचा खून करून आणि त्याचा मृतदेह लवकर सापडू नये म्हणून शेतात फेकून देऊन आरोपी फरार झाले होते ही घटना 26 ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती याप्रकरणी ईरवंत धोंडीबा धोंडापुरे यांच्या फिर्यादी वरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम 302,201,143,147,148,149 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी खून करून पसार झाल्यानंतर ते अहमदनगर जिल्ह्यातून रेल्वे पळून जात असल्याबाबत धर्माबाद चे डी वाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी श्रीरामपूरचे डी वाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली होती त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी तात्काळ नगर शहरापासून पुढे श्रीगोंदा, बेलवंडी रेल्वे स्टेशन येथे टीम रवाना करू सचिन विश्वनाथ खंडगावे,दत्तप्रसाद बालाजी ढगे,रवी धोंडीबा ढगे ,कृष्णा दत्ताराम ढगे,बालाजी शिवाजी ढगे ,सर्व राहणार चिरली ता बिलोली जि नांदेड यांना श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव, डी वाय एस पी संदीप मिटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पीएसआय समीर अभंग, विठ्ठल बडे, मनोहर गावडे, राजेंद्र आरोळे, मुकेश कुमार बडे, विकास वैराळ, भरत खारतोडे, संभाजी गर्जे,दादासाहेब टाके, किरण बोराडे, विनायक जाधव , योगेश सुपेकर,राजु भोर,संभाजी घोडे ,दादाराव म्हस्के ,नितीन शिरसाठ यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular