Homeराज्यपाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

advertisement

पुणे दि.२५ सप्टेंबर
पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर,
अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप सध्या करण्यात येत असून. शुक्रवारी सायंकाळीपुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने
(एनआयए) केलेल्या कारवाईविरधात करण्यात आलेल्या
आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याचं बोललं जातंय सध्या सोशल मीडियावर हा कथित व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिलेल्या कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी पुणे पोलिसांकडून  गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात  नवीन कलम अॅड करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी कलम 153, 124, 109, 120 ब… हे कलम नव्याने अॅड केले आहेत.

मात्र या व्हिडिओमधील घोषणा या त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या का नाही याबाबत सध्या चांगली चर्चा सुरू आहे. कारण सोशल मीडियावर या व्हिडिओ बाबत हा व्हिडिओ एडिट करून दाखवला जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या व्हिडिओ प्रकरणी सखोल तपास करावा अशी मागणी सध्या मुस्लिम समाजाकडून होत आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular