Homeराज्यबदलीस कारणीभूत असल्याचा संशयावरून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला सहकाऱ्याचा विनयभंग

बदलीस कारणीभूत असल्याचा संशयावरून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिला सहकाऱ्याचा विनयभंग

advertisement

मुंबई – १५ सप्टेंबर
मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने(assistant police inspector ) महिला सहकाऱ्याचा (colleague) पाठलाग तसेच तिला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून एवढेच नव्हे तर त्याने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील मेसेजही पाठवले. याप्रकरणी त्या पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने रीतसर तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (API) अटक केली आहे. दीपक बाबूराव देशमुख असे आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक देशमुखची नुकतीच पोलीस नियंत्रण कक्षात बदली( transfer ) करण्यात आली आहे. ही बदली पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून केली असावी, असा संशय देशमुखला आला होता.

आरोपी देशमुखने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घुसून तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. कुरार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने बुधवारी या कारवाईची माहिती दिली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular