अहमदनगर दि.१० ऑक्टोबर –
शहरातील अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट E 24 संस्थेच्या माध्यमातून (चाँद सुलताना) उर्दू हायस्कूल चालवली जाते. मात्र या संस्थेचे सर्व संचालक मंडळ 22 वर्षापूर्वीच धर्मदाय आयुक्तांनी ना मंजूर केलेले असून, संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असल्याचा आरोप संस्थेचे माजी उपाध्यक्ष सय्यद मतीन अ.रहीम यांनी केला आहे. या संस्थेची चौकशी करण्याची मागणीचे तकरार अर्ज़ सय्यद यांनी धर्मदाय आयुक्तांना दिले असुन. 2000 ते आज पर्यंत या ट्रस्टचे अध्यक्ष हाजी नजीर अहमद शेख (नज्जु पैलवान) हे असून धर्मदाय उपायुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले असून देखील आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचा निषेध म्हणून धर्मदाय उपायुक्त यांना स्मरण पत्र देण्यात आले. व सदर ट्रस्टचे संचालक (नज्जु पैलवान) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शाळेचे व संस्थेचे बँक खात्याचे सन 2000 पासून ते आजपर्यंत खाते उतारे स्टेटमेंट व सन 2000 ते आजपर्यंत शिक्षक भरती नाव व ठराव सहित नावाची यादी शिक्षक व शिक्षकेतर यांची तपासणी करावी तसेच सन 2000 ते आजपर्यंत दाखल केलेली बदल अर्जामधील सर्व कार्यकारणी मंडळाचे नाव पत्त्यासहित व मोबाईल क्रमांकासहित यादी तपासून पहावी व सन 2000 ते आजपर्यंत अजेंडा व ठराव पुस्तक तसेच 11वी व 12 वी साठी झालेले एडमिशन व त्यासाठी घेतलेली सर्व प्रकारची फी ज्या बँक खात्यात जमा केली त्या बँक खात्याच्या 2000 पासून आजपर्यंत खाते उतारा तसेच संस्थेतील संचलित सर्व शाळेत दिलेल्या पदोन्नती मुख्याध्यापक प्रवेशक उपमुख्याध्यापक व इतर यांची सन 2000 ते आजपर्यंत प्र.पत्र व अ.प्रमाणे माहिती घेऊन या सर्व मुद्द्यासहित चौकशी व्हावी या मागणीसाठी संस्थेचे माजी उपाध्यक्ष सय्यद मतीन अ.रहीम यांनी धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मात्र आता या संस्थेच्या संचालक मंडळाचा बदल अचानकपणे रात्रीतून करण्यात आला. सोमवारी सकाळी या संस्थेच्या नवीन संचालक मंडळाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र धर्मदाय आयुक्त यांच्या कडे तक्रार केल्यानंतर रात्रीतुनं अशी काय अचानक उपरती झाली की कोणताही गाजावाजा न करता नवीन संचालक मंडळाची घोषणा घाई घाईने करण्यात आली.
याबाबत नगरसेवक समद खान यांनी पाठपुरावा सुरू केला होता गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याबाबत रीतसर अर्ज देऊन संस्थेत चाललेल्या चुकीच्या प्रकारांबाबत आवाज उठवण्याचे काम केले होते. मात्र सर्वांना अंधारात ठेवून अचानकपणे रात्रीतुन ही संचालक मंडळाची घोषणा करण्यात आल्यानंतर समद खान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की आम्ही पाठपुरा सुरू केल्यानंतर अनेक वर्षांच्या कालावधीनंतर या संस्थेवर सुशिक्षित लोकांची वर्णी लागली आहे असं दिसून येतेय तसेच समाजाची आणि सभासदांची दिशाभूल करण्यासाठी ही नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून याबाबत कायदेशीर पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक समद खान यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात संस्थेचे माजी उपाध्यक्ष सय्यद मतीन अ.रहीम यांनी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दिल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.