अहमदनगर दि.१० सप्टेंबर
उपनगरातील गुलमोहर रोड वरील पारिजात चौकात एका इमारतीच्या गळ्यात सुरू असलेला हुक्का पार्लरवर (hookah parlor )पोलिसांनी छापा(raid )टाकला असून या कारवाईत दोन हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शना खालील उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोना. वसीम पठाण, अहमद इनामदार, पोकॉ. संदीप गिर्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी आनंद सर्जेराव मिसाळ या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारिजात चौकात भर उच्चभ्रू परिसरात हा हुक्क पार्लर चालू होता अनेक तरुण मुले मुली या हुक्का पार्लर वर जात येत होते या हुक्का पार्लर ची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच कारवाई करण्यात आली आहे.