अहमदनगर दि.१७ सप्टेंबर
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या छोट्या गावात 15 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कविता सोनवणे यांच्या घरी दरोडा पडला होता.दरोडेखोरांनी (robber )रात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून अनिल सोनवणे, सुगंधाबाई सोनवणे आणि सुनिता सोनवणे यांना मारहाण करून जखमी केले होते तसेच घरातील २,८१,५०० / – रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते. आजूबाजूच्या लोकांना लवकर माहिती मिळू नये म्हणून चोरट्यांनी पळून जाताना सोनवणे यांच्या घराच्या बाहेर दरवाजाची कडी लावली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (ko pathav police )कविता अनिल सोनवणे यांनी दिलेल्या अज्ञात दरोडेखोरां विरोधात भादविक . ३ ९ ५,३ ९ ७ प्रमाणे दरोडयाचा robberi ) गुन्हा दाखल करण्यात आला होता .
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (District Superintendent of Police Manoj Patil ) यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गंभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे(local crime branch ) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना तपास करणे बाबत सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे , पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक , मनोहर शेजवळ , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , संदीप घोडके , मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , विश्वास बेरड , पोलीस नाईक शंकर चौधरी , राहुल सोळुंके , संदीप चव्हाण , दिलीप शिंदे , संदीप दरंदले , ज्ञानेश्वर शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल रंणजित जाधव , योगेश सातपुते ,रविंद्र घुंगासे , विजय धनेधर , मेघराज कोल्हे , चापोहेकॉ / संभाजी कोतकर , बबन बेरड , अर्जुन बडे , चापोकों / भरत बुधवंत आशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमून त्यांनी कोपरगाव परिसरातील वारी , सावळीविहीर , रुई गावाचे शिवारात संशयीत आरोपींची शोध मोहीम राबवली याच दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी हा कोकण मठ परिसरातील कारवाडी शिवारात लपला असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला मात्र पोलिसांची चाहूल लागताच या ठिकाणी लपलेले दरडेकोर पळून जाऊ लागले होते मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा . काटवाडी , कोकमठाण , ता . कोपरगाव , अनिल अरुण बोबडे रा . वेस , ता . राहाता ,राहुल दामू भोसले रा . जेऊर पाटोदा , ता . कोपरगाव अशांना ताब्यात घेतले .
या ताब्यात घेतलेले आरोपींनी कोपरगाव येथील संवत्सर
येथील सोनवणे यांच्या घरावर टाकलेल्या दरोडाचे कबुली दिली असून या आरोपींवर पुणे मुंबई ठाणे या ठिकाणी दरोडे खून अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा पडल्यानंतर अवघ्या 24 तासात या दरोड्यांच्या मुसक्या आवळल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचे कौतुक केले आहे. तसेच कोपरगाव परिसरातील नागरिकांनी गुन्हे शाखा च्या टीमचे अभिनंदन केले आहे