Homeशहरकाँग्रेसच्या सावेडी विभागप्रमुख पदी अभिनय गायकवाडांची वर्णी ;आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसची...

काँग्रेसच्या सावेडी विभागप्रमुख पदी अभिनय गायकवाडांची वर्णी ;आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसची रणनीती आखणी

advertisement

अहमदनगर दि.१० सप्टेंबर

कधी नव्हे ते पहिल्यांदाच सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र विभाग प्रमुख पदाची निर्मिती केली आहे. मनसेला राम राम ठोकून काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सावेडीच्या प्रभाग २ मधील युवा चेहरा असणाऱ्या अभिनय गायकवाड यांची या पदावर वर्णी लागली आहे. तसेच त्यांच्यावर शहर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नियुक्तीची घोषणा करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, ब्लॉक सरचिटणीस स्वप्निल पाठक, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, मनोज वाळके, संतोष जाधव, अजय ठोंबरे, अरविंद टेंभुरकर, संदीप माने, अभिजित लोखंडे, शाहू होले, स्वप्नील सातव, राजू डाके, गणेश शिंदे, संदीप कसबे, आकाश गायकवाड, दादासाहेब कांबळे, आकाश गायकवाड, करण साळवे आदी उपस्थित होते.

मनपा निवडणूक वर्षाभरावर येऊन ठेपली आहे. एका बाजूला मनपाच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसने शहरात राळ उठवली आहे. अनेक मुद्द्यांवर मनपा प्रशासनाला घेरणाऱ्या काँग्रेसने सध्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरण मोहिमे विरोधात दंड थोपटले आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसची संघटनात्मक बांधणी देखील वेगाने सुरू आहे. सावेडी उपनगर हे महत्त्वाचे मानले जाते. या भागात सुशिक्षित व मध्यमवर्गीयांची मोठी मतदार संख्या आहे. व्यवसायिक, उद्योजक व कामगार वर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. या भागावर लक्ष केंद्रीत करत आगामी मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी काँग्रेसने विशेष रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

याच रणनीतीचा भाग म्हणून स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या, कोणताही गुन्हा नावावर नसणाऱ्या, तरुण नेतृत्वाला काँग्रेसने विभागप्रमुख पदाची संधी दिली आहे. सावेडी विभागात प्रभाग क्रमांक १,२,४,५,६ व ७ अशा सुमारे ६ प्रभागांचा समावेश आहे. २४ नगरसेवक उपनगराचे मनपात प्रतिनिधित्व करतात. सुमारे १ लाखाहून जास्त मतदार संख्या असल्याने सावेडी उपनगर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. शहर जिल्हा काँग्रेसने १५ ऑगस्टला सावेडीच्याच प्रभाग २ मध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा जाहीर मेळावा घेत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनय गायकवाड म्हणाले की, किरण काळे यांच्या रूपाने अनेक वर्षानंतर दूरदृष्टी, विकासाचे व्हिजन असणारा उच्चशिक्षित, निर्भीड नेता नगर शहराला मिळाला आहे. पक्षाने त्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्यामुळेच शहरात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सावेडी उपनगरात मनपा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून जोरदार बांधणी आम्ही सुरू केली आहे. सावेडी उपनगरातून फार कमी जागा मागच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यापैकी प्रभाग २ मध्ये काँग्रेसचे २ नगरसेवक मिळालेल्या जागांपैकी निवडून आले आहेत. स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे २४ जागांवर सक्षम व काँग्रेस पक्ष आणि जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे काम काळे यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे.

लवकरच केडगावलाही स्वतंत्र विभागप्रमुख :
केडगाव स्वतंत्र उपनगर आहे. केडगावमध्ये प्रभाग १६, १७ असे मिळून ८ नगरसेवक आहेत. सुमारे ४० हजार मतदार संख्या आहे. केडगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागील काळात केडगावमध्ये पक्षाला आलेली मरगळ झटकून नवीन दमाच्या नवोदित तरुण चेहऱ्यांच्या खांद्यावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. लवकरच केडगावला देखील स्वतंत्र विभाग प्रमुख नियुक्त करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular