अहमदनगर दि.२३ जुलै
अहमदनगर मनमाड रोडवरील सीना नदीवरील पुला जवळील वळणावर एक मोठा ट्रक पलटी झाला असून या घटनेत ट्रक चालक जखमी झाला आहे. त्या जखमी ट्रक ड्रायव्हरला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ट्रक रोडवर पलटी झाल्यामुळे काही काळ या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी या ठिकाणावरून जाणारे ऍड. विक्रम वाडेकर, प्रा. संजय पाटील,प्रा.दत्तात्रय दहातोंडे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडी क्रेनच्या साह्याने बाजूला घेतली त्या नंतर वाहतूक सुरळीत झाली.
पाह व्हिडीओ