Homeविशेषऔरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनावरून राज्यात रान पेटवणाऱ्या एमआयएम आणि शिवसेना नेत्यांचे मुले लंडन...

औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनावरून राज्यात रान पेटवणाऱ्या एमआयएम आणि शिवसेना नेत्यांचे मुले लंडन मध्ये एकत्र

advertisement

औरंगाबाद दि.२७ मे

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सोबत औरंगाबादचे खा.इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे महराष्ट्रात ज्यांच्यामुळे संतापाची लाट उसळली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे भाजप यांनी याबद्दल चांगलीच टीका केली होती.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर अतिक्रमण करणाऱ्या औरंग्याचे दर्शन घेतले म्हणून अनेकांनी टीका केली होती मात्र या या घटनेमधील औरंगाबादचे एमआयएम खासदार
इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल जलील आणि मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र
आदित्य ठाकरे यांची लंडनमध्ये भेट झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारण एकमेकांचे पक्के वैरी असलेल्या या पक्षांच्या नेत्यांची पुढची पिढी अशा प्रकारे एकत्र
भेटल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
लंडनमध्ये दोघेही वैयक्तिक कामांसाठी गेले
असताना आदित्य ठाकरे आणि बिलाल जलील
यांनी परस्परांची भेट घेतली. आदित्य आणि
बिलाल यांच्या भेटीचे हे फोटो सोशल मीडियातून
प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र भाजप मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या फोटोवर चांगलीच सडकून टीका केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular