अहमदनगर दि.२६ जानेवारी
राहुरी येथील न्यायालयातील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव वकिल दाम्पत्य गुरुवार दुपार पासून अचानक रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याने वकिल संघटना तसेच तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.वकिल दाम्पत्यांचा शोध घेण्यासाठी राहुरी येथील पोलिस पथके रवाना झाली होती. तर शहरासह तालूक्यात विविध चर्चा सुरु होत्या.
ॲड. राजाराम जयवंत आढाव, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड. राजाराम आढाव हे गुरुवारी दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली होती. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता होते. आज पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आले होते. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले होते.
या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना दोघांचे मृतदेह एका वेरी मध्ये आढळल्यामुळे राहुरी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. उंबरे येथील अमरधाम जवळील विहिरीमध्ये दोन्ही मृतदेह यांना दगड बांधण्यात आल्याचं निदर्शनास आले आहे. तर राजाराम आढाव यांना गोळ्या घालून ठार मारले असून मनीषा आढाव यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याचेही समजतंय हा खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची चर्चा सध्या जोरात असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी काही संशयित लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या खुना बाबत अजूनही काही माहिती मिळवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.