जळगाव दिनांक 15 सप्टेंबर
जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (
(Police Inspector) किरण कुमार बकाले यांनी फोनवर बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह(controversial statement )विधान केले होते.ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता किरण कुमार बकाले यांच्यावर कारवाई करावी मागणी होत आहे. अनेक मराठा संघटना याबाबत आक्रमक झाल्या असून ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर निरीक्षक किरण कुमार बकाले याच्या निलंबनाचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी. शेखर यांनी काढले आहेत.
तर एका अधिकाऱ्याने चुकीचे वक्तव्य केल्याने त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असून निलंबन करण्यात आले आहे तसेच पुढील चौकशी अहवाल लवकरात लवकर येईल त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले आहे