HomeUncategorizedअहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद रोडवरील राज चेंबर समोरील रस्त्यावर कडेला घाणीचे साम्राज्य

अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद रोडवरील राज चेंबर समोरील रस्त्यावर कडेला घाणीचे साम्राज्य

advertisement

अहमदनगर दि.२२एप्रिल
अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद रोडवर असलेल्या ईदगाह मैदान समोर अत्यंत दुर्गंधी पसरली असून या भागामध्ये हॉटेलचे उष्टे खरकटे अन्न त्यात हाडे मांसाचे तुकडे आणून टाकत असल्यामुळे या भागात दिवसेंदिवस दुर्गंधी वाढत आहे.

अशोका हॉटेलच्या पुढे आल्यानंतर तर ते थेट राज चेंबर पर्यंतच्या पुढच्या बाजू पर्यंत या रोडवरून श्वास घेऊन कुणीही जाऊ शकत नाही इतकी घाणेरडी दुर्गंधी या परिसरात पसरलेली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून सध्या सर्वच खात्यांचे अधिकारी जात येत असतात मात्र त्यांच्या नाकाला ही दुर्गंधी येत नसेल का हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, या सर्व कार्यलयात जाण्यासाठी अधिकारी आणि नागरिक याच रोड चा उपयोग करतात. मात्र रोडवरच सर्व कचरा आणि मांसाचे तुकडे पडले असून हे तुकडे सडल्या नंतर अत्यंत घाण दुर्गंधी या परिसरात पसरली आहे.

याच रोड वर मुस्लिम समाजाची पवित्र मज्जिद आणि एक दर्गा या रोडवर असून या ठिकाणी रोज शेकडो नागरिक जात येत असल्याने त्यांना सुद्धा याचा मोठा त्रास होत आहे.या कचरा टाकण्याचा समोरच मुस्लिम समाजाचे सामूहिक नमाज पठाणाचे ईदगाह मैदान असून त्या मागे मोठी लोकवस्ती आहे. मात्र या कुजलेल्या कचऱ्यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या ठिकाणी हॉटेलचा कचरा टाकण्यास आणि हाडे मांस टाकणाऱ्या वर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात या दुर्गंधी आणि सडलेल्या कचऱ्याचे मुळे एखाद्या आजाराची साथ पसरू शकते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular